तुम्हीपण तुमच्या मैत्रिणीला असं शोधलय का?

इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली माहिती

नेहा नावाच्या मुलीने एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली की ती तिच्या बालपणीच्या मैत्रिणीचा शोध घेत आहे.

कोणाला शोधत होती नेहा?

नेहा लक्षिता नावाच्या मैत्रिणीला शोधत होती. नेहाला लक्षिताचे नाव आठवत होते पण ती तिचे आडनाव विसरली होती.

अन् नेहाने घेतली इन्स्टाग्रामची मदत

यानंतर नेहाने लक्षिताला शोधण्यासाठी इंस्टाग्रामची मदत घेतली आणि एक युक्ती अवलंबली. त्या आयडियामुळे नेहा 18 वर्षांनंतर बालपणीच्या मैत्रिणीला भेटू शकली. (फोटो - heyyneha/ Instagram)

तुला हा फोटो माहिती आहे का?

नेहाने इंस्टाग्रामवर लक्षिता नावाच्या जवळपास सर्व मुलींना मेसेज केला आणि विचारले की तिला हा फोटो माहित आहे का? (फोटो - heyyneha/ Instagram)

अन् अखेर लक्षिता सापडली

लक्षिता नावाच्या मुलींना मोठ्या संख्येने मेसेज पाठवल्यानंतर, नेहाला एक मुलगी सापडली जिने सांगितले की होय, ती फोटोत दाखवलेली तीच लक्षिता आहे. (फोटो - heyyneha/ Instagram)

शेवटी मी तुला शोधलेच

यानंतर नेहाने एक पोस्ट लिहिली आणि सांगितले की शेवटी मी तुला शोधले. बरं, तुला शोधणं सोपं नव्हतं पण तरीही मी ते केलं. 18 वर्षांनंतर भेटणे अवास्तव वाटत नाही. (फोटो - heyyneha/ Instagram)

जयपूरला गेल्यानंतर तुटला संपर्क

एलकेजी (2006) मध्ये माझी लक्षिता नावाची एक मैत्रीण होती आणि ती जयपूरला गेल्यावर माझा तिच्याशी संपर्क तुटला. मला तिचे आडनावही आठवत नव्हते. त्यानंतर मी तिला अशी भेटले.

युजर्सनी दिल्या प्रतिक्रिया

एका यूजरने, "एकदा मी मित्र शोधण्यासाठी असेच केले, तेव्हा त्याने मला ब्लॉक केले," असे म्हटले आहे. रजनीश नावाच्या युजरने म्हटलं की, मी सर्व राहुलला फेसबुकवर मेसेज केले, 1000 हून अधिक मेसेज केल्यानंतर राहुल माझा मित्र सापडला.

VIEW ALL

Read Next Story