पोहा इडली झटपट होणारी अशी रेसिपी आहे.
पोहे रवा दही मीठ खाण्याचा सोडा किंवा इनो इतकच साहित्य यासाठी लागणार आहे.
सर्वप्रथम पोहे मिक्सरच्या भांड्यात ग्राइंड करून त्याची जाडसर अशी पावडर करून घ्या.
बारीक केलेल्या पोह्यांमध्ये थोडासा रवा मिक्स करा.
पोह्याची पावडर आणि रवा यामध्ये पाटीभर दही मिक्स करा चवीनुसार थोडे मीठ टाका.
या इडलीच्या मिश्रणात खाण्याचा सोडा किंवा इनो टाकून हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे भिजू द्या.
या मिश्रणामध्ये पाणी मिसळून इडली साठी लागते तशा प्रकारचे थोडेसे घट्टसर इडलीचे बार्टर बनवून 10 ते 15 मिनीटे भिजू घ्या.
इडलीच्या भांड्यात हे मिश्रण टाकून दहा ते पंधरा मिनिटं वाफेवर इडली चांगली फुगू द्या
पोहा इडली खोबऱ्याची चटणी तसेच सांबार सोबत खूपच चविष्ट लागते.