देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींची मुलगी इशा अंबानी रिलायन्स रिटेलचा कारभार संभाळते.
सोबतच ब्युटी ब्राण्ड टीरा आणि इतर ब्राण्ड्सची जबाबदारीदेखील तिच्याकडे आहे.
ईशा ही प्रसिद्ध अंडरगारमेंट्स कंपनीचीदेखील मालकीण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
ईशाची अनेक ब्राण्ड्समध्ये भागीदारी आहे. प्रसिद्ध लॉंजरी कंपनी क्लोवियामध्ये 950 कोटींची तिची गुंतवणूक आहे.
ईशाच्या नेतृत्वात रिलायन्स रिटेलने झिवामे ब्राण्डमध्ये देखील मोठी गुंतवणूक केलीय. हा भारतातील प्रमुख लॉंजरी आणि इनवियर ब्राण्ड आहे.
लॉंजरी ब्राण्डमध्ये तिची सुरुवात भारतातील प्रिमियम इनवियर ब्राण्ड अमांतेपासून झाली. मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांना डोळ्यांसमोर ठेवून हा ब्राण्ड बनवण्यात आलाय.
रिलायन्सचा स्वत:चा लॉंजरी ब्राण्ड असून त्याचे नाव हश असे आहे. रिलायन्स ट्रेण्डच्या माध्यमातून प्रोडक्ट विकले जातात.
तसेच ब्लश लेस या ब्राण्डचा देखील ती विस्तार करत आहे. ईशाच्या नेतृत्वात जिवामेचे अनेक ऑफलाईन स्टोअर्स उघडण्यात आले आहेत. एका वर्षात 100 स्टोअर्स उघडण्यात आल्याचे रिपोर्ट सांगतात.
यासोबतच ईशा अंबानी औषधांची कंपनी नेटमेड, फॅशन ब्राण्ड अजियोमध्ये महत्वाची भूमिका बजावते.