केंद्र सरकारने जीएसटी प्रणालीत मोठा बदल प्रस्तावित केला आहे. सरकारी सूत्रांनुसार, नवीन रचनेत 5 टक्के आणि 18 टक्के असे जीएसटीचे दोन मुख्य दर असतील.
याशिवाय, लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर (जसं की दारू, तंबाखू इ.) 40 टक्के विशेष कर लावला जाईल.
सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या 12 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या सुमारे 99 टक्के वस्तू आता पाच टक्के स्लॅबमध्ये जातील. त्यामुळे त्या वस्तू स्वस्त होतील.