Jagannath rath yatra 2025: भगवान जगन्नाथांचे डोळे इतके मोठे का आहेत? जाणून घ्या

Tejashree Gaikwad
Jun 28,2025


Puri Rath Yatra: हिंदू धर्मात, प्रत्येक देव आणि देवीचे एक वेगळे रूप असते, जे त्यांची शक्ती दर्शवतात.


याच कारणांमुळे प्रत्येक देवाची प्रतिमा एकमेकांपासून वेगळी असते.


आज आम्ही तुम्हाला भगवान जगन्नाथांच्या डोळ्यांमागील रहस्याबद्दल सांगणार आहोत.


या संबंधित अनेक प्रचलित कथा आहेत, त्यापैकी एक म्हणजे जेव्हा भगवान जगन्नाथ राजा इंद्रद्युम्नच्या राज्यात गेले तेव्हा भव्यता पाहून त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले.


त्यानंतर भगवान जगन्नाथांनी त्यांची भक्ती स्वीकारली आणि डोळे मोठेच ठेवले.


आणखी एक लोकप्रिय कथा अशी आहे की भगवान जगन्नाथांचे डोळे इतके मोठे आहेत जेणेकरून ते त्यांच्या भक्तांवर समान नजर ठेवू शकतात.


अजून एक कारण असे की, भाविकांमध्ये गूढता आणि भक्तीची भावना वाढविण्यासाठी शिल्पकार, कारागिरांनी डोळ्यांना मोठे आकार दिले आहेत.

VIEW ALL

Read Next Story