जिओने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन वर्षासाठी नवीन प्लॅन आणला आहे.
या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 90 दिवसांची वैधता असणार आहे.
ज्यात त्यांना दररोज 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
जिओच्या या नवीन प्लॅनची किंमत 899 रुपये इतकी आहे. ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा मिळणार आहे.
त्यासोबतच या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ क्लाउडमध्ये प्रवेश मिळणार आहे.
या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी तुम्हाला 20 GB अतिरिक्त डेटा हा मोफत मिळणार आहे.