हे चिन्ह केदारनाथ धामच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी नवीन आकर्षणाचं केंद्र ठरेल असं सांगितलं जात आहे.
आता हे 'ॐ' चिन्ह पुढील 2 ते 3 आठवड्यांमध्ये लावले जाईल, असंही झिनकन म्हणाले.
'ॐ' चिन्ह बसविण्यासंदर्भातील चाचणी घेण्यात आली. ही चाचणी जी यशस्वी झाली, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र झिनकन यांनी दिली.
हे 'ॐ' चिन्ह भक्तांना प्रेरणा देईल असं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
हे 'ॐ' चिन्ह जर्मनीतून आयात करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.
तांबे आणि पितळ्यापासून हे 'ॐ' चिन्ह तयार करण्यात आले आहे.
हे चिन्हं बसवण्याचे काम सध्या केदारनाथमध्ये सुरू झाले आहे.
केदारनाथ धाममध्ये चबुतऱ्यावर 60 टन वजनाचे 'ॐ' चिन्ह बसवण्यात येणार आहे.
केदारनाथ मंदिरामध्ये सुवर्ण कलश आणि छत्रही बसवण्यात आलं आहे. यानंतर आता केदारनाथमध्ये 'ॐ' चिन्ह बसवलं जाणार आहे.
केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये काही काळापूर्वीच सोन्याचा मुलामा चढवण्यात आला.
केदारनाथमध्ये अति भव्य आकाराचं 'ॐ' चिन्ह बसवलं जात आहे.