डोसा तव्यावर चिकटतोय?

डोसा तव्यावर वारंवार चिकटतोय? ही सोपी ट्रीक वापरून तर पाहा

अलिखित नियम

अनेकदा काही पदार्थ हे काही मंडळींना इतक्या उत्तम रितीनं जमतात की, अमूक एक पदार्थ तमुक एका व्यक्तीनंच बनवावा असा अलिखित नियम असतो.

खरी कसरत

डोसा, हा त्यातलाच एक पदार्थ. इथं पीठ दळण्यापासून खरी कसरत सुरु होते. त्यामुळं डोसा सोपा वाटत असला तरीही तो बनवणं मोठी बाब.

एक कला

डोसा करताना तो तव्याला न चिकटता अगदी सुरेखरित्या खरपूस भाजूनच तव्यातून काढणंही एक कला. कारण, अनेकदा तव्यातील बदल, आच कमी जास्त राहणं किंवा मग काहीतरी बिनसून डोसा तव्यालाच चिकटणं असा गोंधळ होतोच.

नेमकं काय करावं?

अशा वेळी नेमकं काय करावं? तर सोप्यातली सोपी ट्रीक म्हणजे डोसा तव्याला चिकटत असल्यास उलटणं पाण्याच्या एका वाटीत भिजवा.

हळूच तो उलटा

उलटण्याचा ओलावा टिकून असेपर्यंतच डोसा चारही बाजूंनी किनाऱ्यापासून सैल करा आणि हळूच तो उलटा.

ही सोपी ट्रीक वापरून पाहा

डोसा करत असताना आच एकसारखी ठेवणं आणि वारंवार ती कमीजास्त न करणंही तितकंच महत्त्वाचं. इथून पुढं डोसा तव्यावर चिकटल्यास तवा बदलून भांडी वाढवण्यापेक्षा ही सोपी ट्रीक वापरून पाहा.

VIEW ALL

Read Next Story