तुम्ही वापरता ते मीठ भेसळयुक्त तर नाही? कसं ओळखाल, जाणून घ्या
मीठ हे चवीनुसार आणि गरज पडल्यास त्याहूनही कमी खाल्लेलच बरं. तुम्हाला माहितीये का या मीठातही भेसळ होते? ऐकून धक्का बसत असला तरी हे खरंय.
मीठाचे शरीराला अनेक फायदे आहेत. यामधून शरीराला आवश्यक असणाऱ्या आयोडिनची पूर्तता केली जाते.
पदार्थांमध्ये असणाऱ्या चिमुटभर मीठामुळं हायपोथायरॉईडीझम पासून सुरक्षित राहता येतं.
मीठाचे हे फायदे तेव्हाच शरीराला फळतात जेव्हा ते शुद्ध असेल. पण ही शुद्धता नेमकी ओळखायची कशी?
मीठाची शुद्धचा ओळखण्यासाठी एक बटाटा घ्या आणि त्याचे तुकडे करा.
आता बटाट्याच्या एका बाजूला मीठ लावून ते 3 ते 4 मिनिटं तसंच राहू द्या.
पुढे बटाट्यावर दोन थेंब लिंबाचा रस टाका. खरं गुपित तर आता उघड होणार आहे.
कारण लिंबाचा रस टाकताच मीठाचा रंग निळा झाल्यास समजा ते अशुद्ध अर्थात भेसळयुक्त आहे.
लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकूनही त्याचा रंग बदलला नाही तर, ते मीठ शुद्ध असून, रोजच्या जेवणात वापरासाठी फायद्याचं आहे असं समजा.