Pan Card हा भारतातील प्रत्येक व्यक्तीचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. ज्याचा नागरिकांना बँक अकाउंट सुरु करण्यापासून ते इनकम टॅक्स रिटर्न्स भरण्यापर्यंत सर्व ठिकाणी उपयोग होतो.
Pan Card चा वापर अनेक कामांसाठी केला जातो, मात्र सध्या याबाबत अनेक फ्रॉड सुद्धा समोर येत आहेत.
काहीजण पॅनकार्डचा गैरवापर करून अनधिकृतपणे कर्ज घेतात आणि त्या पैशांची चोरी करतात.
अनेकदा ज्याचं पॅनकार्ड हे फ्रॉड करण्यासाठी वापरलं जातंय त्याला याची माहिती नसते. ज्यामुळे याचा परिणाम त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर पडू शकतो.
अशा पॅनकार्ड फ्रॉडपासून वाचण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी तुमच्या पॅनकार्डवर तुमच्या परवानगी शिवाय कोणी लोन तर घेतलं नाही ना हे तपासायला हवं.
कसं तपासायचं? तुम्ही Paytm किंवा Paisabaazar सारख्या फिनटेक अँपवर जावा. आता आपल्या पॅनकार्ड मार्फत साईन इन करा आणि ओटीपीने व्हेरीफाईड करा.
त्यानंतर लोन किंवा क्रेडिट हेल्द सेक्शन सिलेक्ट करा. इथे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या नावावर कोणी लोन तर घेतलेलं नाही ना.
जर तुमच्या पॅनकार्डवर कोणी अनधिकृतपणे तुम्हाला न सांगता लोन घेतलं असेल तर संबंधित बँकेशी संपर्क करा आणि सायबर क्राईमकडे या संदर्भात तक्रार द्या.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)