गॅस सिलिंडर

गॅस सिलिंडरही Expire होतो; जाणून घ्या त्यावर असणाऱ्या प्रत्येक आकड्याचा अर्थ

Jun 19,2023

महत्त्वाची माहिती

चुकिच्या पद्धतीनं गॅस सिलिंडर हाताळल्यास तो तितकाच धोकादायकही ठरतो. त्यामुळं त्याच्याविषयी काही महत्त्वाची माहिती असणं कधीही फायद्याचच.

सिलिंडर निरखून पाहिला आहे का?

तुम्ही कधी हा सिलिंडर व्यवस्थित निरखून पाहिला आहे का? नसेल पाहिला तर, आताच ही माहिती वाचा आणि कायम लक्षातही ठेवा.

एक अक्षर आणि एक आकडा

गॅस सिलिंडरच्याच वरच्या भागात तीन उभ्या पट्ट्यांपैकी एका पट्टीवर इंग्रजीतील एक अक्षर आणि एक आकडा लिहिलेला असतो.

फार सहज लक्ष जात नाही

सिलिंडरच्या वजनाव्यतिरिक्त या आकड्याकडे फार सहज लक्ष जात नाही आणि गेलं तरीही तो नेमका कशासाठी आहे असा प्रश्न फारच क्वचित पडतो.

असं होऊ देऊ नका

असं होऊ देऊ नका. कारण हा क्रमांकही तितकाच महत्त्वाचा आहे. A, B, C आणि D च्या पुढे असणारा आकडा हा ठराविक तिमाही अधोरेखित करतो.

A to D अक्षरं आणि त्यांचे अर्थ

A म्हणजे जानेवारी ते मार्च, B म्हणजे एप्रिल ते जून, C म्हणजे जुलै ते सप्टेंबर, D म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर अशा चार तिमाहिंमध्ये ही अक्षरं विभागली गेली आहेत.

आकडा वर्ष दर्शवतो.

या अक्षरांच्या पुढे असणारा आकडा वर्ष दर्शवतो. म्हणजेच C17 हा कोड तुमच्या सिलिंडरवर असत्याल त्याचा अर्थ या सिलिंडरची चाचणी 2017 मधील जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत केली गेली असावी.

उदाहरण

हल्लीचच उदाहरण घ्यायचं झाल्यास ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला B23 चा सिलिंडर मिळाल्यास तो बदलण्याची विनंती करा कारण, त्याची चाचणी झाली नसावी. थोडक्यात हा कोड सिलिंडरची Expiry दर्शवतो.

अजाणतेपणानं संकट ओढवून घेऊ नका

सहसा हा प्रकार घडत नाही, पण अजाणतेपणानं संकट ओढवून घेऊ नका. तुम्हाला माहितीये का दर 10 वर्षांनी सिलिंडर मोठमोठ्या चाचण्यांसाठी पाठवले जातात. सहसा एका सिलिंडरच्या वापरासाठीचा काळ असतो 15 वर्षे. या काळात त्याची दोनदा चाचणी पार पडते. या चाचणीच्या टप्प्याला सिलिंडर ओलांडू शकला नाही तर तो Scrape केला जातो.

VIEW ALL

Read Next Story