ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत लाल किल्ला हे नाव अनेकांच्याच डोक्यात येतं. ही वास्तू तिच्यावर असणारं नक्षीकाम, भव्यता आणि लाल रंगामुळं लगेचच नजरेत भरते.
दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी इथं पंतप्रधानांकडून झेंडावंदनाचा कार्यक्रमसुद्धा पार पडतो त्यामुळं या वास्तूला आणखी महत्त्वं प्राप्त आहे.
थोडं इतिहासात डोकावून पाहिलं असता लक्षात येतं की मुघलांनी जेव्हा राजधानी आग्रा येथून दिल्लीला आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा 1648 मध्ये शहाजहांनं लाल किल्ला उभारला.
मुघलकाळात ही वास्तू मुघलांचा शाही किल्ला होती. त्यावेळी या वास्तूला किला-ए-मुबारक म्हणून ओळखलं जात होतं.
किला-ए-मुबारक म्हणजे नशीबवान किल्ला. हीच त्या काळात लाल किल्ल्याची ओळख होती.
पुढं या किल्ल्याला त्याच्या लाल रंगामुळं लाल किला म्हटलं जाऊ लागलं. अनेकांनीच या नावाला पसंती दिली.
मुघलांनी दिलेल्या नावापेक्षाही लाल किल्ला हेच नाव तिथपासून प्रचलित झालं आणि ती ओळख आजपर्यंत कायम राहिली...