जगातील सर्वात मोठी लोकशाहीचा उत्सव असलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडत आहे.
एकूण 44 दिवस निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार असून त्यात 7 पट्ट्यांमध्ये मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्याचं मतदान 1 जून रोजी होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी मोठ्या संख्येनं निवडणूक कर्मचाऱ्यांना नियुक्त केलं जातं.
निवडणुकीसाठी काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दर दिवसाचा भत्ता दिला जातो. ते कोणत्या प्रोफाइलवर काम करत आहेत यावर ही रक्कम अवलंबून असते.
वेगवेगळ्या दर्जाचा कर्मचाऱ्यांना वेगवेगळं मानधन दिलं जातं. उदाहरणार्थ पीठासीन अधिकाऱ्याला दिवसाचा 1550 रुपयांचा मेहनताना मिळतो.
निवडणुकीच्या काळात प्रथम स्तरावरील कर्मचाऱ्याला म्हणजेच फर्स्ट लेव्हल कर्मचाऱ्याला 1150 रुपये मानधन मिळतं. द्वितिय स्तरावरील म्हणजेच सेकेंडरी लेव्हलच्या कर्मचाऱ्याला दिवसाचे 900 रुपये भत्ता म्हणून दिले जातात.
निवडणुकीच्या काळात नियुक्त केलेल्या अतिरिक्त पीठासीन अधिकाऱ्याला दिवसाचा 850 रुपये भत्ता दिला जातो.
तसेच फर्स्ट लेव्हलच्या अतिरिक्त कर्मचाऱ्याला 650 रुपये मानधन मिळतं. सेकेंडरी लेव्हलच्या अतिरिक्त कर्मचाऱ्याला दिवसाचे 450 रुपये भत्ता म्हणून दिले जातात.