मतदान करणं हे प्रत्येक भारतीयांच कर्तव्य आहे. मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटाला शाई लावली जादे. 1962 ला या प्रक्रियेला सुरुवात झाली.
मतदानावेळी बोटाला शाई लावण्याचं श्रेय देशाचे पहिले मुक्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जातं. याला निवडणूकीची शाई किंवा इंडेलिबल इंक असं म्हटलं जातं.
निवडणुकीची निळी शाई मैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेडमध्ये बनवली जाते. याची सुरुवात 1937 मध्ये महाराज नलवाडी कृष्णराजा वडयार यांनी केली होती.
निवडणूक शाईची कुठेही विक्री केली जात नाही. केवळ सरकार आणि निवडणूक संस्थांकडे ही शाई पुरवली जाते. भारताशिवाय इतरही काही देशांमध्ये या शाईची निर्यात केली जाते.
मतदान केल्यानंतर बूथवरील कर्मचारी मतदान केल्याचा पुरावा म्हणून मतदाराच्या बोटाला ही शाई लावतो. ही शाई तीन दिवस म्हणजे जवळपास 72 तास बोटावर राहते.
शाई बनवणाऱ्या MVPL कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार निवडणूक शाई बनवण्यासाठी सिल्व्हर नायट्रेट केमिकलचा वापर केला जातो. यामुळे शाई पटकन पुसता येत नाही.
सिल्व्हर नायट्रेट केमिकल जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतं त्यावेळी ते काळं किंवा गडद निळ्या रंगाचं होतं. त्यामुळे ते सहज मिटवता येत नाही.
निळी शाई पाणी, डिटर्जंट, साबण आणि इतर सॉल्व्हेंट्सला प्रतिरोधक बनवण्यात आली आहे. या शाईपासून त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही