भगवान शंकर जगदिश,महादेव आणि त्रिकालदर्शी अशा अनेक नावांनी ओळखले जातात.
साकार आणि निराकार रुपात पुजले जाणारे ते एकमेव देव आहेत.
भगवान शंकराचा एक मोठा परिवार आहे.
भगवान शंकराच्या माता-पित्यांबद्दल माहिती घेताना याचे स्पष्ट संदर्भा मिळत नाही.
शिव पुराणात एक संदर्भा सापडतो, ज्यानुसार भगवान शंकराचे माता-पितादेखील आहेत.
श्रीमद्भागवत देवी महापुराणात भंगवान शंकराच्या जन्माचे वर्णन आहे.
भगवान शंकर आणि तुमचे पिता कोण आहेत? असा प्रश्न एकदा नारदांनी ब्रम्हदेवाला विचारला.
देवी दुर्गा जी महामाया, दुर्गा आणि प्रकृती आहे, तीच आम्हा तिघांची माता आहे, असे ब्रम्हा सांगतात.
काल ब्रम्हा, अर्थात काल सदाशिव आमचे पिता असल्याचेही त्यांनी सांगितल्याचा उल्लेख पुराणात आहे.
यासंदर्भात पुराणात आणखी एक कथेनुसार, विष्णू सांगतात, मी तुमचा पिता आहे. कारण माझ्या नाभीतील कमळातून तुम्ही उत्पन्न झाला आहात.
ब्रम्हा-विष्णूचा हा वाद सुरु असताना सदाशिव तेथे पोहोचतात आणि सांगतात, तुम्हा दोघांची उत्पत्ती माझ्यातून झाली आणि शंकरालाही मी जन्म दिलाय.