काय महाग, काय स्वस्त!

आजपासून चांदी, पितळ, सिगारेट, सोने, प्लॅटिनम,आयात केलेले दरवाजे, खेळणी, सायकल, इलेक्ट्रिक किचन चिमणी महागणार आहे. तर आजपासून मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वाहने, टेलिव्हिजन संच, बॅटरी, कॅमेरा लेन्स, कॅमेरा स्वस्त होणार आहे.

टोल महागला

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील प्रवास महागलाय. एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात तब्बल 18 टक्के वाढ झाली आहे. नव्या दरानुसार कारचा टोल 270 रुपयांवरुन थेट 316 रुपये होणार आहे तर बस साठी टोलचा 795 वरुन 940 रुपयांवर जाणार आहे.

औषधे महाग

दररोज घेण्यात येणारी औषधे महाग होणार आहे. पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे महाग होणार आहेत.

सोने-चांदी महागणार

केंद्र सरकारने सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमाशुल्कात 20 टक्क्यांवरुन 25 टक्के तर चांदीवर 7.5 टक्क्यांवरुन 15 टक्के करण्यात आले आहे. यामुळे यांच्या किमती वाढू शकतात.

7.5 लाख उत्पन्नावर कर नाही

7.5 लाखपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागू होणार नाही. नवी कर प्रणाली निवडणाऱ्यांना रिबेटसाठीची 7 लाखांची मर्यादा असणार आहे. याआधी 5 लाख इतकी मर्यादा होती.

रिबेटसाठीची 7 लाखांची मर्यादा

अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार नव्या कर प्रणालीत 50 हजार रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शनदेखील असणार आहे.

नवी करप्रणाली लागू

आजपासून नवी करप्रणाली लागू होणार आहे. शेअर बाजार, इन्कम टॅक्स आणि गुंतवणुकीच्या अनेक नियमांत बदल झालेत.

VIEW ALL

Read Next Story