भारतातील 6 रहस्यमय मंदिरे, एकदा तरी भेट द्याच!

भारतातील अनेक मंदिरे हे स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. आजही अनेक मंदिरातील रहस्य कायम आहेत. भारतात काही असे मंदिर आहेत ज्यांनी आजही त्यांचे वेगळेपण जपले आहे. जाणून घेऊया या मंदिरांची नावे

धारी देवी मंदिर

धारी देवी मंदिर हे उत्तराखंड येथे आहे. कालीमातेचे हे मंदिर रहस्यमय असल्याचे मानले जाते. दिवस मावळल्यानंतर हे मंदिर आपले रूप बदलते, असं बोललं जाते.

कामाख्या मंदिर

कामाख्या देवी मंदिराबाबत प्रत्येकजण जाणतोच. असं म्हणतात की, वर्षांतून एकदा कामाख्या माता रजस्वला होतात.

निधिवन मंदिर

निधिवन मंदिराबाबत अनेक कथा समोर येतात. असं म्हणतात की या मंदिरात राधा-कृष्णा दररोज रासलीला करतात.

राजराजेश्वरी देवी मंदिर

राजराजेश्वरी देवी मंदिर त्रिपुरा येथे आहे. असं म्हणतात की या मंदिरातील देवता एकमेकांसोबत बोलतात.

करणी माता मंदिर

करणी माता मंदिर राजस्थानातील बीकानेर येथे असून या मंदिरात लाखोच्या संख्येने उंदीर फिरतात

मंच मुरुगन मंदिर

मंच मुरुगन मंदिर हे केरळमधील विशाल मंदिर आहे. इथे देवाला चॉकलेटचा नैवेद्य दाखवल्यास मनातल्या इच्छा पूर्ण होतात असं मानले जाते.

VIEW ALL

Read Next Story