देबर्ती म्हणाल्या, मला माझ्या आईला लग्नासाठी तयार करायला खूप वेळ लागला. आधी मी तिला कोणाशी तरी मैत्री करायला सांगितले. सुरुवातीला मी एवढंच म्हटलं की निदान बोला. मित्र बनवा मग मी म्हणाले की, एवढे झाले आता लग्न करुन घ्या.
अखेर आईने माझे ऐकले आणि तिने या वर्षी मार्चमध्ये पश्चिम बंगालमधील स्वपन नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. दोघेही 50 वर्षांचे आहेत. यासोबतच स्वपनचं हे पहिलं लग्न असल्याचं देबर्तीने सांगितले. तसेच त्यांनी माझ्या आईचा मनापासून स्वीकार केला आहे. आता दोघेही खूप सुखात आहेत.
देबर्ती सांगते की, तिचे वडील शिलाँगचे प्रसिद्ध डॉक्टर होते. ती लहान असतानाच ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचे अचानक निधन झाले. तेव्हा आई 25 वर्षांची होती. आणि ती स्वतः 2 वर्षांची होती.
ही अनोखी स्टोरी आहे देबर्ती चक्रवर्ती आणि तिची आई मौसमी चक्रवर्ती यांची. या दोघी मेघालयची राजधानी शिलाँग येथील रहिवासी आहेत. वडिलांच्या निधनानंतर या देबर्ती या आईसोबत शिलाँगमध्ये आपल्या नानीच्या घरी शिफ्ट झाल्या होत्या.