रहस्यमयी मंदिर

NASA लाही गोंधळवणाऱ्या उत्तराखंडमधील 'या' रहस्यमयी मंदिराची रंजक गोष्ट

कसार देवी

हे स्थळ म्हणजे उत्तराखंडच्या अल्मोडा येथील कसार देवी मंदिर. असं म्हणतात की खुद्द स्वामी विवेकानंदसुद्धा इथं ध्यानधारणेसाठी आले होते. 70 च्या दशकामध्ये ही टेकडी हिप्पी हिल म्हणूनही चर्चेत राहिली.

लोकप्रिय व्यक्तींची हजेरी

आतापर्यंत या ठिकाणाला बॉब डायलन, जॉर्ज हैरिसन, कैट स्टीवंस, एलन गिन्सबर्ग यांसारख्या अनेक लोकप्रिय व्यक्तींनी हजेरी लावली आहे.

चुंबकीय शक्ती

स्थानिकांची अशी धारणा आहे, की इथं देवी साक्षात अवतारात प्रकटली होती. किंबहुना अनेक जाणकार आणि शास्त्रज्ञांच्या मतेसुद्धा हे भारतातील असं एकमेव ठिकाण आहे जिथं चुंबकीय शक्ती अस्तित्वात आहे.

चुंबकीय पिंड

कसार देवी मंदिर परिसरात अनेक असे चुंबकीय पिंड आहेत जिथं बसून तुम्ही ध्यानधारणा करू शकता. इथं असणाऱ्या चुंबकीय शक्तीचा शोध लावण्यासाठी नासाची मंडळीही आली, पण त्याच्या हातीसुद्धा अपयशच लागलं.

ध्यानधारणा

इथं येऊन ध्यानधारणा करणाऱ्या मंडळींना परमोच्च आंतरिक शांती आणि पूर्णत्वाची अनुभूती होते असं सांगितलं जातं. इथून परतणारा प्रत्येक व्यक्ती हा प्रसन्न मनानंच परततो असा स्थानिकांचा विश्वास आहे.

पर्यटन

कसार देवी आणि मंदिर परिसर मागील काही वर्षांमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्धीझोतात आल्यामुळं सध्या तिथं पर्यटनालाही वाव मिळत आहे. हो, पण या ठिकाणाचं पावित्र्य मात्र अबाधित आहे हे नाकारता येणार नाही.

कसं पोहोचायचं?

विमान मार्गानं इथं पोहोचायचं झाल्यास पंतनगर विमानतळ इथून 124 किमी अंतरावर आहे. जिथून तुम्ही खासगी वाहनसेवेच्या मदतीनं इथं पोहोचू शकता.

रेल्वे आणि रस्ते मार्ग

रेल्वे आणि रस्ते मार्गानंही कसार देवी मंदिरापर्यंत पोहोचता येतं. इथं असणाऱ्या लहानशा खेड्यांमध्ये पर्यटकांना राहण्याची आणि जेवण्याची सुविधा पुरवली जाते. ज्यासाठीचे दर किरकोळ आहेत.

नक्की भेट द्या.

भविष्यात इथं तुमचं येणं झालं तर या अदभूत मंदिर परिसराला नक्की भेट द्या. बघा, तुम्हालाही भारावणारा अनुभव येतो का...

VIEW ALL

Read Next Story