शंकराची पूजा करण्यासाठी सोमवार हा शुभ दिवस मानण्यात आला आहे. सोमवारी भोलेनाथ आणि शिवलिंगाची पूजा करुन त्यांचे भक्त आशीर्वाद मागत असतात.
शंकराची पूजा करताना देवाला त्याचा आवडता भोगही चढवला जातो. अनेक लोक शिवलिंगावर चढवलेल्या प्रसादाचं सेवन करतात. पण हे योग्य आहे का?
भगवान शंकराचा फोटो आणि शिवलिंग यांची पूजा करण्याची पद्धत, नियम वेगवेगळे आहेत. दोघांचीही पूजा एकाच प्रकारे केली जाऊ नये. इतकंच नाही तर दोघांना भोगही वेगवेगळा असावा.
पुजेच्या वेळी देवाला अर्पण केलेला भोग इतर देवी-देवतांच्या मंदिरात प्रसादाच्या स्वरूपात भाविकांमध्ये वाटला जात असल्याचं तुम्ही पाहिलं असेल.
परंतु शिवलिंगावर अर्पण केलेला भोग प्रसाद म्हणून न खाण्याचा सल्ला दिला जातो. हा भोग चुकूनही स्वीकारू नये.
धार्मिक ग्रंथानुसार भूत आणि आत्म्यांचा प्रमुख चंडेश्वर महादेवाच्या मुखातून प्रकट झाला होता. शिवलिंगावर अर्पण केलेला भोग हा चंडेश्वराचाच भाग असल्याची धारणा आहे. यामुळेच शिवलिंगावर अर्पण केलेला भोग प्रसाद म्हणून स्वीकारण्यास मनाई आहे.
धार्मिक मान्यतांनुसार, शिवलिंगावर अर्पण केलेला भोग नदीत प्रवाहित करावा.
धार्मिक ग्रंथानुसार भगवान शंकराच्या फोटोला अर्पण केलेला भोग प्रसाद म्हणून सेवन करु शकतो.