पेन्शन बंद होणार?

पेन्शन बंद होणार? आताच वाचा सविस्तर बातमी

पेन्शन

आता मात्र ज्या वृद्धांना मुलं आहेत त्यांना मात्र पेन्शन मिळणं बंद होणार आहे. या निर्णयामुळं अनेक ज्येष्ठांना पेन्शनपासून वंचित राहावं लागणार आहे.

पेन्शन योदना

श्रावण बाळ निवृत्ती योजनेअंतर्गत निराधारांना राज्य शारनाकडून 800 रुपये, केंद्र शासनाकडून 200 रुपये इतकी रक्कम मिळते.

पेन्शनची रक्कम

इंदिरा गाँधी राष्ट्रीय निवृत्ती योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून 700 रुपये आणि केंद्र शासनाकडून 200 रुपये अशी रक्कम मिळते.

वृद्धापकाळ योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेच्या माध्यमातून केंद्राकडून 200 आणि राज्य शासनाकडून 800 रुपये अशी 1000 रुपयांची पेन्शन मिळते.

लाभार्थी

लाभार्थ्यांच्या आकड्याविषयी सांगावं तर, देशभरात या योजनांचे 2 लाख 75 हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. दरवर्षी या आकड्यात भरच पडत असते.

पेन्शनच्या नियमात मोठे बदल

आता मात्र या पेन्शनच्या नियमात मोठे बदल झाल्याचं सांगण्यात येत आहे. नव्या नियमाअंतर्गत हे बदल होणार असून, मोठ्या संख्येनं ज्येष्ठांना त्याचा फटका बसणार आहे.

65 वर्षे वय असल्यास..

नव्या नियमानुसार ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे आणि ज्यांच्या मुलांचं वय 25 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे त्यांना मिळणारी पेन्शन बंद होईल.

संमिश्र प्रतिक्रिया

विधवा आणि दिव्यांग महिलांना राष्ट्रीय पेन्शन योजनांअंतर्ग मिळणारी रक्कम इथून पुढंही मिळतच राहणार आगे ही बाब लक्षात घ्यावी. दरम्यान, शासनाच्या या निर्णयावर सध्या संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

तीव्र नाराजी

सध्याच्या घडीला देशात एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असून, विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात येत आहे. उतारवयात अर्थार्जनाचा कोणताही मार्ग नसल्या कारणानं आता या वृद्ध मंडळींकडून पेन्शनसंदर्भातील या नव्या नियमाबबातच तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

VIEW ALL

Read Next Story