भारतात रेल्वेचं जाळं मोठया प्रमाणात असून दररोज लाखो प्रवासी रेल्वे मार्गाचा वापर करतात. यामुळे रेल्वे स्थानकांना मोठा महसूल मिळवतो.
भारतीय रेल्वेची रेल्वे स्थानकं दरवर्षी दुकानं, जाहिराती आणि प्लॅटफॉर्म तिकिटं यासारख्या विविध उत्पन्न स्रोतांद्वारे कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.
भारतीय रेल्वेची रेल्वे स्थानकं दरवर्षी दुकानं, जाहिराती आणि प्लॅटफॉर्म तिकिटं यासारख्या विविध उत्पन्न स्रोतांद्वारे कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.
उत्पन्नाच्या बाबतीत मुंबई, चेन्नई इत्यादी रेल्वे स्थानकं सर्वात श्रीमंत असतील असं तुम्हाला वाटतं असेल. पण ते चुकीचं आहे.
2023-24 आर्थिक वर्षात नवी दिल्ली रेल्वे स्थानक हे भारतातील सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक ठरले आहे. त्यांनी 3337 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले.
उत्पन्नात आघाडीवर असण्यासोबतच, ते सर्वात गर्दीच्या स्थानकांमध्ये देखील स्थानक आहे, जिथे वर्षभरात 39,362,272 प्रवासी भेट देतात.
सर्वात श्रीमंत रेल्वे स्थानकांच्या बाबतीत हावडा रेल्वे स्थानक हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाई करणारे स्थानक आहे. पश्चिम बंगालमधील या स्थानकाचे वार्षिक उत्पन्न 1692 कोटी रुपये आहे.