Operation Sindoor ची हिरो सोफिया कुरेशीला किती मिळतो पगार?
ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी ओटीए (ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी) मधून प्रशिक्षण घेतल्यानंतर 1999 मध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झालं.
त्यांनी यापूर्वी ईशान्य भारतातील पूर मदत कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कुरेशी यांचा मूळ पगार ₹1,21,200 ते ₹ 2,12,400 दरम्यान आहे.
त्यांना भारत सरकारकडून अनेक प्रकारचे भत्ते आणि फायदे दिले जातात.
कर्नल सोफिया कुरेशी यांना महागाई भत्ता देखील दिला जातो, जो सध्याच्या महागाईवर अवलंबून असतो.
त्यांचं क्षेत्र किती धोकादायक आहे या आधारावर फील्ड एरिया भत्ता दिला जातो.
फील्ड एरिया भत्ता सहसा 10,500 ते 25,000 रुपयांपर्यंत असतात.
3600 ते 7200 रुपयांपर्यंत वाहतूक भत्ता दिला जातो. हे स्थानावर अवलंबून आहे.
सर्व लष्करी कर्मचाऱ्यांना गणवेश भत्त्याअंतर्गत दरवर्षी 20,000 रुपये दिले जातात.
स्पेशल फोर्स युनिटमध्ये काम करत असेल तर त्याला 25,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाते.