जगभरात आजही एका अशा संन्यस्त व्यक्तीची चर्चा होते, ज्याच्या नावाभोवती वादाचं वलयही पाहायला मिळतं.
या व्यक्तीच्या अनुयायांचा आकडा तेव्हाही मोठा होता आणि आजही मोठा आहे. हा परदेशी अनुयायी आणि आलिशान राहणीमान असणारा अनेकांचाच गुरू म्हणजे ओशो.
ओशोंना लक्झरी कारची आणि त्यातही रोल्स रॉयस या आलिशान कारची विशेष आवड होती.
एकदा खुद्द ओशो यांनीच सांगितलेलं, की शिष्यांना असं वाटे की त्यांनी वेगवेगळ्या रोल्स रॉयस कारमधून फिरावं. मला तर, यापैकी एकाही कारची गरज नाही, असं ते म्हणाले होते.
शिष्यांना यातून आनंद मिळत असेल तर, मी त्यांना दुखवू इच्छित नाही; असंही ओशोंनी स्पष्ट केलं होतं.
ओशोंच्या निधनानंतर 1990 मध्ये त्यांच्या काही कारचा लिलाव करण्यात आला, तर काही कार संग्रहालयात आणि खासगी कलेक्शनमध्ये ठेवण्यात आल्या.
रोल्स रॉयल्स कार त्यांच्या आलिशान लूक आणि अद्वितीय वैशिष्ठ्यांसाठी ओळखली जात असून, ही जगातल सर्वात महागडी कार निर्माती कंपनी आहे.