पाताळ लोकच्या कहाण्या आपल्याला गोष्टी ऐकायला, वाचायला सर्वांनाच आवडतात.
भारतातल्या कोणत्या राज्यात पाताळ आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
मध्य प्रदेशमध्ये पाताळात जाण्याचा मार्ग आहे, असे म्हटलं जातं.
मध्य प्रदेशमध्ये वाहणाऱ्या नर्मदा नदीला पाताळचा मार्ग असे म्हटले जाते.
या नदीमध्ये असे खूप मार्ग आहेत, जिथून तुम्ही पाताळमध्ये जाऊ शकतात.
जेव्हा प्रलय होईल तेव्हा या नदीचे पाणी पृथ्वीभर पसरेल, असा उल्लेख पुराणात अनेक ठिकाणी आहे.
अमरकंटकमध्ये असलेला मैखल पर्वत हे या नदीचे उगम स्थान आहे.
ही नदी पूर्व ते पश्चिम अशा उलट्या दिशेने वाहते.