उरी, पुलवामा यांसारख्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन लष्करी कारवाई केली होती.
दहशतवाद्याच्या तळावर भारतीय सैन्यानं एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकसुद्धा केला होता. नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा शब्द पुन्हा सातत्यानं पुढे येताना दिसला.
किंबहुना सामान्यांपासून ते अगदी अनेक स्तरांपर्यंत सर्वांनीच पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात भारतीय सैन्यदलानं सर्जिकल स्ट्राईक करावं अशी मागणीही केली. अशा या सध्या प्रचंड वापरात असणाऱ्या शब्दाचा मराठी आणि हिंदीतील नेमका अर्थ माहितीये?
मराठीमध्ये शब्दश: अर्थ घ्यायचा झाल्यास सर्जिकल स्ट्राईकला शस्त्रक्रिया हल्ला किंवा नियम आधारित हल्ला म्हणावं. एखाद्या विशिष्ठ ठिकाणी नेमकेपणानं केलेली लष्करी कारवाई असा त्याचा अर्थ.
हिंदीत सर्जिकल स्ट्राईकला 'सैन्य हमला' असं म्हणतात. याशिवाय सर्जिकल स्ट्राईकला असणारं आणखी एक हिंदी नाव म्हणजे 'लक्ष्यित हमला'.
सर्जिकल स्ट्राईकच्या हल्ल्यांमध्ये प्रभावित क्षेत्राबाहेरील आजुबाजूच्या परिसरात इतर कोणतंही नुकसान होणार नाही याची दक्षता घेत शत्रूचे तळ उध्वस्त केले जातात. आजवर जगभरात अनेक सैन्यांनी ही कारवाई केली आहे.