मध्य प्रदेशातील पन्नाला हिऱ्यांचे शहर असेही म्हणतात. येथे खोदाकामासाठी जमिनीचा पट्टा अवघ्या 200 रुपयांना मिळतो.
मौल्यवान हिरे बहुतेक वेळा पन्नाच्या खाणीतून मिळतात.
जमीन भाडेतत्त्वावर घेऊन कोणतीही व्यक्ती पन्नामध्ये खोदकाम करू शकते.
हिरे शोधण्यासाठी सरकार 8 बाय 8 मीटर जागा देते.
उत्खननात हिरा सापडल्यास तो हिरा कार्यालयात जमा करावा लागतो.
जमा झालेल्या हिऱ्यांचा सरकार लिलाव करते. लिलावातून मिळणाऱ्या पैशातून 12 टक्के रॉयल्टी कापली जाते.
उर्वरित 80 टक्के रक्कम जागा विकत घेऊन खोकं केलेल्याला परत केली जाते. हिऱ्यांचा शोध लागल्यानंतर अनेकांचे नशीब बदलले आहे.