भाषण एक विक्रम अनेक... मोदींनी मोडला स्वत:चाच विक्रम

पंतप्रधान मोदींनी आज म्हणजेच 2023 च्या भाषणाच्या कालावधीने अनेक विक्रम मोडीत काढलेत. हे कोणते ते पाहूयात...

देशाला उद्देशून मोदींचं भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर देशाला उद्देशून भाषण केलं. 2024 च्या निवडणुकीपूर्वीचं मोदींचं हे लाल किल्ल्यावरील शेवटचं भाषण ठरलं.

मोदींनी वाचला विकासकामांचा पाढा

पंतप्रधान मोदींनी अनेक विषयांना हात घालताना सरकारच्या विकास कामांचा पाढा आपल्या भाषणात वाचला. मोदींनी केलेल्या या भाषणाने एक नवा विक्रम स्थापित केला आहे.

अनेक विक्रम मोडले

पंतप्रधान मोदींनी आज म्हणजेच 15 ऑगस्ट 2023 रोजी केलेल्या भाषणामुळे स्वत:चाचे पूर्वीचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

सर्वाधिक वेळ भाषण देणाऱ्या पंतप्रधानांची यादी

सरासरी मोदींचं स्वातंत्र्य दिनाचं भाषण हे 82 मिनिटांचं असतं. सर्वाधिक वेळ भाषण देणाऱ्या पंतप्रधानांची यादी पाहूयात...

स्वातंत्र्यानंतरचं पहिलं भाषण किती वेळ चाललं?

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी 1947 साली दिलेलं पहिलं भाषण हे 72 मिनिटं सुरु होतं.

इंदिरा गांधींचं भाषणही यादीत

इंदिरा गांधींनी 1984 लाल किल्ल्यावरुन 64 मिनिटं भाषण केलं होतं.

राजीव गांधींचाही समावेश

राजीव गांधींनी 1985 साली 56 मिनिटांमध्ये लाल किल्ल्यावरुन आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवलं होतं.

अटल बिहारी वाजपेयी यांचं सर्वात मोठं भाषण किती वेळ चाललं?

अटल बिहारी वाजपेयी यांनी 2002 साली पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरुन भाषण देताना 73 मिनिटांचा वेळ घेतला होता.

यादीमध्ये मनमोहन सिंग यांचंही नाव

मनमोहन सिंग यांनी 2006 साली तब्बल 91 मिनिटं लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना भाषण केलं होतं.

लाल किल्ल्यावरुन मोदींचं पहिल्या भाषणाला किती वेळ लागला?

2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणासाठी मोदींनी 65 मिनिटांचा वेळ घेतला होता.

नेहरुंचा विक्रम मोडीत काढला

2015 मध्ये मोदींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचा सर्वाधिक कालावधीसाठी भाषण देण्याचा विक्रम मोडीत काढला होता. या वर्षी मोदींनी 88 मिनिटं भाषण केलं होतं.

सर्वात मोठं भाषण झालं 2016 साली

2016 साली पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन 94 मिनिटं भाषण केलं होतं. मोदींचं हे सर्वाधिक मिनिटांचं भाषण ठरलं.

2017 चं भाषण सर्वात छोटं

नरेंद्र मोदींनी 2017 साली अवघ्या 56 मिनिटांमध्ये लाल किल्ल्यावरील आपलं स्वातंत्र्यदिनाच भाषण संपवलं होतं.

2019 च्या निवडणुकीआधीचं शेवटचं भाषण

2018 मध्ये म्हणजेच 2019 च्या निवडणुकीच्या आधीच्या शेवटच्या भाषणासाठी मोदींना 80 मिनिटांचा कालावधी लागला होता.

दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिलं भाषण किती वेळ झालं?

पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 2019 साली दिलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी 92 मिनिटांचा वेळ घेतलेला.

2020 मध्ये लागली 90 मिनिटं

त्यापूर्वी 2020 साली मोदींनी स्वातंत्र्यदिनाचं भाषण संपवण्यासाठी 90 मिनिटं घेतली होती.

2021 मध्ये 88 मिनिटांचं भाषण

2021 साली मोदींनी 88 मिनिटांचं भाषण लाल किल्ल्यावरुन केलं होतं.

2022 साली 74 मिनिटं

पंतप्रधान मोदींनी 2022 साली 74 मिनिटांमध्ये आपलं स्वातंत्र्यदिनाचं भाषण संपवलं होतं.

आजच्या भाषणाला किती वेळ लागला?

नरेंद्र मोदींनी 2024 च्या निवडणुकीआधीच्या लाल किल्ल्यावरील शेवटच्या भाषणासाठी 90 मिनिटांचा वेळ लावला. म्हणजेच मोदींनी 2014, 2015, 2017, 2018, 2021, 2022 च्या भाषणांपेक्षा अधिक वेळ आजच्या भाषणाला लावला.

VIEW ALL

Read Next Story