शपथविधी सोहळ्याला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते. त्याचबरोबर बॉलिवूडपासून उद्योगपतींपर्यंत अनेक दिग्गजही या सोहळ्याला हजर होते.
आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिरला या सोहळ्याला उपस्थित होते.
रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी या सोहळ्याला हजर होते. सोहळ्यात ते अनेकांच्या गाठीभेटी घेतानाही दिसले.
मुकेश अंबानी यांच्याबरोबर त्यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबांनी सुदधा या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थि होते.
अनंत अंबानी यांच्याबरोबर मुकेश अंबानी यांचे जावई आणि उद्योगपती अजय पिरामल यांचे पूत्र आनंद पिरामल शपथविधी सोहळ्याला हजर होते.
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीही हजेरी लावली. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी प्रीती अदानी आणि मुलगा करण अदानी देखील उपस्थित होते.
आदित्य बिरला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिरला हे देखील मोदी मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखने या सोहळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
याशिवाय अभिनेता अक्षय कुमार कुमारही शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता.