राहुल गांधींचा महिन्याचा पगार किती? समोर आला आकडा

मोठा निर्णय

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेमधील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी वाय्यनाडसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.

एक महिन्याचा पगार दिला

राहुल गांधींनी केरळमध्ये मागील महिन्यात भूसख्खलन झालेल्या वाय्यनाडसाठी आपला एक महिन्याचा पगार मदत म्हणून दिला आहे.

निधी सुपूर्द केला

केरळ काँग्रेस प्रदेश कमिटीला राहुल गांधी यांनी हा निधी सुपूर्द केला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे फटका बसलेल्यांच्या पुनर्वसनासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

भारतीयांना केलं आवाहन

मी सर्व भारतीयांना विनंती करतो की त्यांना शक्य होईल तेवढी मदत त्यांनी करावी, असं आवाहन राहुल गांधींनी केलं आहे.

राहुल गांधीचे आभार

राहुल गांधींनी आपला एका महिन्याचा पगार वाय्यनाडमधील पीडितांसाठी मदत म्हणून दिल्याबद्दल केरळ प्रदेश काँग्रेसने त्यांचे आभार मानले आहेत.

एका महिन्याचा पगार किती?

राहुल गांधींनी त्यांचा एका महिन्याचा पगार दिला म्हणजेच त्यांनी मदत म्हणून 2.30 लाख रुपये दिले आहेत.

दोन ठिकाणावरुन जिंकले पण...

राहुल गांधी हे लोकसभा 2024 ची निवडणूक वाय्यनाड आणि बरेली या दोन्ही मतदारसंघांमधून जिंकले होते. त्यापैकी त्यांनी वाय्यनाडचं खासदारपद नंतर सोडलं.

400 हून अधिक लोकांचा मृत्यू

वाय्यनाडमधील भूसख्खलनामध्ये 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये स्थानिकांबरोबर पर्यटकांचाही समावेश आहे. या ठिकाणी राहुल गांधींनी भेटही दिलेली.

VIEW ALL

Read Next Story