येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. आता अयोध्येच्या राम मंदिराचे आणि त्यातील मूर्तीची काही खास वैशिष्ट्ये आता समोर आली आहेत.
प्रभू श्रीराम हे श्यामला वर्णाचे होते. त्यासोबतच अयोध्येतील प्रभू श्रीरामांची मूर्ती ही काळ्या शाळिग्राम शिळेपासून बनवण्यात आली आहे.
अयोध्येतील राम मंदिर हे वर्षानुवर्षे टिकावं, त्याची वारंवार डागडुजी करावी लागू नये यासाठी यात लोखंड आणि स्टीलचा वापर केलेला नाही.
कोणत्याही मंदिराच्या गर्भगृहात मूर्तीला जमिनीसोबत जोडण्यासाठी तांब्याचा पाईप लावण्यात येतो. यामुळे उर्जेचे प्रसारण होते.
राम मंदिराचे छप्पर बनवण्यासाठी तांब्याचा वापर करण्यात येत आहे. जेणेकरुन हे बांधकाम वर्षानुवर्षे टिकून राहिल.
राम मंदिराच्या 2000 फूट खाली रामायणाशी संबंधित काही गोष्ट लपवण्यात आल्या आहेत. जेणेकरुन येणाऱ्या कितीतरी पिढ्यांसाठी या गोष्टी सुरक्षित राहतील.
रामाची मूर्ती बनवताना शाळिग्राम शिळेव्यतिरिक्त कोणत्याही दगडाचा वापर करण्यात आलेला नाही.
म्हैसूर येथील प्रख्यात मूर्तीकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची ही मूर्ती घडवली आहे.
रामाच्या मूर्तीची उंची पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत 51 इंच इतकी आहे. या मूर्तीची चमक वर्षानुवर्ष टिकणारी आहे.
प्रभू श्री रामाच्या मूर्तीमध्ये दशावतार पाहायला मिळत आहेत. यात परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्कि, वामन, नृसिंह, वराह, कर्म, मत्स्य हे अवतार पाहायला मिळत आहेत.
प्रभू श्री रामांची मूर्ती उभ्या अवस्थेत बनवण्यात आली आहे कारण दूर असलेल्या लोकांनाही त्यांचे लोभस रुप पाहता येईल.