सध्या संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे.

येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या दरम्यान भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या खास नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर रामायणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यात हेमा मालिनी यांनी सीतेची भूमिका साकारली होती.

हेमा मालिनी यांनी सीतेच्या व्यक्तीरेखेतील काही फोटो पोस्ट केले आहेत.

यावेळी हेमा मालिनी यांनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. त्याबरोबरच काही पारंपारिक दागिनेही परिधान केल्याचे दिसत आहेत.

या कार्यक्रमावेळी हेमा मालिनी यांनी पारंपारिक नृत्यही सादर केले.

हा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व कलाकारांनी स्वामी रामभद्राचार्य यांचे आशीर्वाद घेतले.

VIEW ALL

Read Next Story