भारतात असे एक रेल्वे स्टेशन आहे, जिथे एकही कर्मचारी नाहीये.
या रेल्वे स्टेशनची सर्व जबाबदारी येथे असणारे गावकरी संभाळतात.
राजस्थानच्या सीकर या ठिकाणी हे रशीदपुरा खोरी हे अनोखे रेल्वे स्टेशन आहे.
या स्टेशनवर फक्त 2 प्लेटफॉर्म आहेत. येथे प्रवासी ट्रेन देखील येतात आणि जातात.
2004 मध्ये उत्पन्न कमी असल्याने रेल्वे विभागाने हे रेल्वे स्टेशन बंद केले होते.
यानंतर येथील स्थानिक नागरिकांनी हे स्टेशन चालू केले. सध्या गावकरीच हे स्टेशन संभाळतात.