उन्हाळ्यात प्रत्येक घरात फ्रिजचे तापमान कमी करुन अधिक वापरला जातो.
अशा परिस्थितीत फ्रिजची योग्य काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण योग्य काळजी न घेतल्यास फ्रिजच्या कंप्रेसरवर वाईट परिणाम होऊ शकतात.
तुम्ही जर या चुका करत असाल, तर फ्रिजचे कंप्रेसर बॉम्ब प्रमाणे फुटू शकतो.
गरजेपेक्षा कमी तापमान ठेवण्यामुळे कंप्रेसर फुटण्याची शक्यता असते.
फ्रिजसाठी कधीही कमी पावरचे प्लग वापरू नका. नेहमी उच्च पावर असलेले प्लग वापरा.
फ्रिजमध्ये कधीही अधिक सामान भरू नये. तसेच गरम पदार्थ देखील ठेवू नयेत.
फ्रिजला नेहमी मोकळ्या जागी ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याची गरम हवा सहज बाहेर पडू शकेल.
घरातील फ्रिज नेहमी स्वच्छ ठेवावे. यामध्ये घाण साचू देऊ नका.
फ्रिज दरवाजा सारखा उघड आणि बंद करू नका. त्याने फ्रिजचे तापमान कमी-जास्त होऊन कंप्रेसर फुटण्याची शक्यता वाढते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)