2023-24 या आर्थिक वर्षात केरळ सरकारने बिअर आणि मद्यविक्रीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कमवल्याचं समोर आलं आहे.
केरळमध्ये मागील आर्थिक वर्षात 19 हजार 88 कोटी 68 लाखांची बिअर आणि मद्यविक्री झाली आहे.
या बिअर आणि मद्यविक्रीमधून केरळ सरकारने वर्षभरामध्ये तब्बल 16 हजार 609 कोटी 63 लाखांचा निधी कर स्वरुपात मिळवला.
केरळ स्टेट ब्रेव्हेजर्स कॉर्परेशनच्या माध्यमातून केरळमध्ये होलसेल विक्रीसाठीचं वितरण होते.
केरळातील 80 टक्के होससेल मद्याचं वितरण केरळ स्टेट ब्रेव्हेजर्स कॉर्परेशनच्या माध्यमातून होतं.
केरळमध्ये विक्री होणाऱ्या मद्यापैकी 80 टक्के मद्य इतर राज्यातून येतं तर केवळ 20 टक्के मद्य राज्यात तयार होतं.
केरळ स्टेट ब्रेव्हेजर्स कॉर्परेशनच्या मालकीच्या 277 दुकानांमधून ही मद्यविक्री झाली.
केरळमध्ये एकूण 32.9 लाख लोक मद्यपान करतात असंही या आकडेवारीवरुन समोर आलं आहे.
या 32.9 लाख मद्यपान करणाऱ्यांमध्ये 3.1 लाख महिला आहेत.
केरळमध्ये दिवसाला 5 लाख लोक मद्यपान करतात.