एफडी

सुरक्षिक ठेव योजनांमध्ये एफडीचा समावेश होतो. अनेक ठेवीदारही दीर्घकाळाच्या गुंतवणुकीसाठी हा पर्याय निवडतात. अशाच ठेवीदारांसाठी एसबीआयनं एक नवी स्किम आणली आहे.

Amrit Kalash FD

SBI Amrit Kalash FD Deposit Scheme असं या योजनेचं नाव असून बँकेनं ही स्कीम नव्यानं खातेधारकांच्या भेटीला आणली आहे.

परतावा

यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.6% टक्के व्याजदरानं परतावा मिळतो. तर, सर्वसामान्य नागरिकांना 7.1 टक्क्यानं व्याजाचा परताला मिळतो. 400 दिवसांसाठीच्या ठेवीवर हा फायदा मिळतो.

अधिक माहिती

डोमेस्टिक डिपॉजिट आणि NRI टर्म डिपॉझिटसाठी जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांची एफडी करता येऊ शकते. शिवाय या योजनेमध्ये तुम्हाला प्रिमॅच्योर विथड्रॉवल आणि कर्जाचीही सुविधा मिळते.

30 जून 2023

30 जूनपर्यंत तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता. त्यामुळं हाताशी पैसे असल्यास त्यांचा अवाजवी खर्च टाळण्यासाठी तुम्ही इथं ते गुंतवू शकता.

व्याजाचा कालावधी

अमृत कलश योजनेअंतर्गत तुम्हाला प्रती महिना, त्रैमासिक आणि दर सहा महिन्यांनी व्याज मिळतं.

एफडीवर मिळणारं व्याज

तुम्ही या योजनेमध्ये स्वत:च्या सोयीनुसार एफडीवर मिळणारं व्याज ठरवू शकता. या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खातेधारकांच्या खात्यात ही रक्कम जमा होते.

टीडीएसही

आयकर विभागाच्या अटीशर्थींनुसार यावर तुम्हाला टीडीएसही भरावा लागतो. तुम्ही या योजनेत सहभागी होण्यासाठी एसबीआयच्या शाखेला भेट देऊ शकता.

YONO

SBI YONO अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. जिथं तुम्हाला कर्जाची सुविधाही उपलब्ध असेल.

VIEW ALL

Read Next Story