SBI

SBI च्या 'या' एफडीमध्ये लॉक इन पिरियडचं टेन्शनच नाही; ATM मधूनही सहज काढू शकता पैसे

एफडी

तुम्ही जेव्हा एफडीमध्ये पैसे ठेवता तेव्हा, निश्चित काळासाठी तुम्हाला ते काढता येत नाहीत. असं केल्यास तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागते.

योजना

SBI मध्ये मात्र एक अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्याजही मिळेल आणि गरज असताना तुम्ही ATM मधून पैसेही काढू शकता.

व्याज

SBI Multi Option Deposit असं या योजनेचं नाव. यामध्ये डिपॉझिटरला इतर एफडीप्रमाणंच व्याज मिळतं.

एफडीचा कालावधी

या योजनेमध्ये तुमचा पैसा कायम Liquid स्वरुपात असतो. त्यामुळं एफडीचा कालावधी संपण्यापूर्वी तुम्ही तो कोणत्याही दंडाशिवाय काढू शकता.

ठराविक रक्कम

एटीएम किंवा चेकच्या माध्यमातून तुम्ही हे पैसे काढू शकता. अगदी तुम्ही बचत खात्यातून पैसे काढता तसंच. ठराविक रक्कम काढल्यानंतर उर्वरित रकमेवर तुम्हाला व्याज मिळतच राहील. त्यामुळं निश्चिंत राहा.

अतिरिक्त व्याज

एसबीआयच्या या योजनेत तुम्ही किमान 1 वर्ष ते कमाल 5 वर्षांपर्यंत पैसे ठेवू शकता. यामध्ये जेष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळतं.

VIEW ALL

Read Next Story