महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथे कधीच चोरी होत नाही.
आम्ही नाही तर त्या गावातील लोकंच असं सांगतात.
महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर हे ते ठिकाण आहे.
या गावाचे रक्षण स्वत: शनिदेव करतात, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
या कारणामुळे येथील कोणत्या घरात दरवाजा दिसणार नाही.
घरांव्यतीरिक्त येथे दुकान, बॅंकांनादेखील टाळे नसते.
गावकऱ्यांची शनिदेवावर खूप श्रद्धा आहे.
शनिदेव आपल्या घर आणि गावाची रक्षा करतात, असे गावकरी मानतात.
याच आस्थेमुळे येथे आजही घरांमध्ये दरवाजे नसतात.