10 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले आणि भविष्यात मोठा परतावा देतील अशी शक्यता व्यक्त केले जात असलेले पेनी शेअर्स कोणते आहेत पाहूयात...
सन 1983 पासून कनानी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी हिऱ्यांच्या दागिण्यांच्या उद्योगामध्ये आहे.
कनानी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या एका शेअरची किंमत 4.35 कोटी रुपये इतकी आहे. या कंपनीची मार्केट कॅप 86.07 कोटी इतकी आहे.
सन 1994 मध्ये भंडारी होजरी एक्सपोर्ट्स लिमिटेडची स्थापना झाली. कापड उद्योगामध्ये पैसा गुंतवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
भंडारी होजरी एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या एका शेअरची किंमत सध्या 9.45 रुपये इतकी आहे. कंपनीची मार्केट कॅप 153.63 कोटी इतकी आहे.
एफसीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीची स्थापना 1993 साली झाली आहे. ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे.
एफसीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन्स लिमिटेडच्या एका शेअरची किंमत 4.55 रुपये इतकी आहे. कंपनीची मार्गेट कॅप 769.30 कोटी इतकी असून ही कंपनी उत्तम रिटर्नस देऊ शकते.
प्रकाश स्टीलेज लिमिटेड ही कंपनी स्टेनलेस स्टील ट्यूब निर्मिती क्षेत्रात 1996 पासून कार्यरत आहे. या कंपनीची मार्केट कॅप 142.63 कोटी इतकी आहे.
प्रकाश स्टीलेज लिमिटेडच्या एका शेअरची किंमत 8.15 रुपये इतकी आहे.
खासगी वीज निर्मिती क्षेत्रातील ही आघाडीची कंपनी आहे. रत्नइंडिया पॉवर लिमिटेड कंपनीची मार्केट कॅफ 5.18 कोटी रुपये इतकी आहे.
रत्नइंडिया पॉवर लिमिटेडच्या एका शेअरची किंमत 9.65 रुपये इतकी आहे. ऊर्जा क्षेत्रात अल्प गुंतवणुकीसाठी हा उत्तम पर्याय आहे.
Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.