अशनीर ग्रोव्हरची 'ती' पोस्ट तुफान चर्चेत

अशनीरशी अनेकांनी सहमती दर्शवली असून खरोखरच हा मुद्दा गंभीर असल्याचं म्हटलंय. नेमकं काय घडलंय पाहूयात...

Swapnil Ghangale
Aug 29,2023

अशनीरची पोस्ट चर्चेत

'शार्क टँक इंडिया'च्या पहिल्या पर्वामध्ये जज म्हणून सहभागी झालेल्या अशनीर ग्रोव्हरने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे.

पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

28 ऑगस्ट रोजी अशनीरने केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत असल्याचं दिसत आहे. शिक्षणासंदर्भात अशनीरने एक विधान केलं आहे.

बालवाडी आणि आयआयटीची तुलना

अशनीरने नर्सरी म्हणजेच बालवाडीमधील दाखल्याची तुलना आयआयटी प्रवेश परीक्षेबरोबर केली असून बालवाडीत प्रवेश मिळवणं हे आयआयटी प्रवेशापेक्षा कठीण असल्याचं म्हटलंय. अशनीरला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

शाळांबद्दल केलं विधान

दिल्ली- एनआरसीमधील खासगी शाळांमध्ये मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणं हे आयआयटीच्या प्रवेश परीक्षेपेक्षाही कठीण आहे असं अशनीरचं म्हणणं आहे.

आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यापेक्षा कठीण

तुमच्या आवडीच्या खासगी शाळेमध्ये तुमच्या 4 वर्षाच्या मुलाला प्रवेश मिळवून देणं हे आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यापेक्षा कठीण आहे, असं ट्वीट अशनीरनं केलं आहे.

कोणत्याही पालकांना विचारलं तरी...

किमान दिल्ली-एनसीआरमध्ये हे लागू होतं. मागील 10 वर्षांपासून यामधून गेलेल्या कोणत्याही पालकांना तुम्ही विचारला. शाळांची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त आहे, असं अशनीरने म्हटलं आहे.

...तर आयपीएलही मागे पडेल

दिल्ली-एनसीआरमधील नर्सरी म्हणजेच बालवाडीच्या जागांसाठी लिलाव घेतला तर ते आयपीएलच्या लिलावालाही मागे टाकतील, असंही अशनीर म्हणाला.

आयपीएल दुसऱ्या स्थानी असेल

बालवाडीच्या जागांचा लिलाव झाल्यास आयपीएल लिलाव हा देशातील दुसरा महागडा लिलाव ठरेल, अशी खोचक प्रतिक्रिया अशनीरने नोंदवलीय.

अनेकांनी दर्शवली सहमती

अनेकांनी अशनीरच्या या मताशी सहमती दर्शवली आहे. या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या असून अनेकांनी हल्ली शिक्षण म्हणजे व्यवसाय झाल्याचं म्हटलं आहे.

अनेकांनी फीचा मुद्दाही लक्षात आणून दिला

अशनीरच्या या पोस्टवर अनेक पालकांनी या खासगी शाळांच्या फी सुद्धा कॉलेजएवढ्या किंवा किंचित अधिकच असल्याचं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story