दिवसाची कमाई 12 लाख रुपये

म्हणजेच हे दोघेही या आपल्या समोसा विक्रीच्या व्यवसायामधून दिवसाला 12 लाख रुपये कमवतात.

Mar 16,2023

वार्षिक उलाढाल 45 कोटींची

आज निधी आणि शिखरच्या 'समोसा सिंह'ची वर्षिक उलाढाल 45 कोटी इतकी आहे.

घर विकलं

उद्योग करण्यासाठी पैसा हवा म्हणून निधी आणि शिखरने 80 लाखांना आपलं घरं विकलं.

...अन् निर्णय घेतला

एका मुलाला फूड कोर्टमध्ये रडताना पाहून समोसा विक्रीचा उद्योग करण्याचा आपला विचार योग्य असून या पदार्थाला सर्वच स्तरातून मागणी आहे यावर शिखरचा विश्वास बसला. त्याने नोकरी सोडली, निधीनेही त्याच्याबरोबर बिझनेस करण्यास होकार देत नोकरीचा राजीनामा दिला.

वैज्ञानिक पद्धतीने उद्योग करण्याचा विचार

दोघांनी नोकरी सोडून बंगळुरुमध्ये 'समोसा सिंह' नावाची स्टार्टअप कंपनी सुरु केली. नोकरी करताना शिखरला समोश्याचा बिझनेस करण्याची कल्पना सुचली. पण हा उद्योग वैज्ञानिक पद्धतीने करावा असा सल्ला निधीने दिला.

तिचं पॅकेज होतं 30 लाख

दुसरीकडे निधी गुरुग्राममधील एका फार्मा कंपनीमध्ये काम करत होती. तिचं वार्षिक पॅकेज 30 लाख रुपये इतकं होतं. मात्र तिनेही नोकरी सोडली.

तो बायोटेक कंपनीत होता कमाला

शिखर वीर सिंहने हरियाणातील बायोटेक्नोलॉजीच्या शिक्षणानंतर हैदराबादमधील इंस्टीट्यूट ऑफ लाइफ सायन्सनेसमधून एमटेकचं शिक्षण घेतलं. शिखर वीर सिंह नंतर बायोकॉन कंपनीत नोकरी करु लागला. मात्र शिखरने 2015 मध्ये नोकरी सोडली.

लग्नाला झाली 5 वर्ष

निधी आणि शिखर यांच्या लग्नाला 5 वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. दोघेही आधी हरियाणातील बायोटेक्नोलॉजीचं शिक्षण करताना भेटले. इथूनच त्यांचा प्रवास सुरु झाला.

समोसे विकून कोट्याधीश झाले

समोसे विकून निधी आणि शिखर कोट्याधीश झाले आहेत. अर्थात समोसे विकून एखादी व्यक्ती कोट्याधीश झाली हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल मात्र निधी आणि शिखरने हे करुन दाखवलं आहे.

सेटल आयुष्य सोडलं

बेंगळुरुमधील निधि सिंह आणि तिचा नवरा शिखर वीर सिंह यांनी सेटल आयुष्य सोडून नवीन उद्योग सुरु करण्याचा विचार केला आणि याच हिंमतीच्या जोरावर आज ते कोट्याधीश झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story