अनेकजण जास्त अंतर कमी वेळेत पार करण्यासाठी हवाई प्रवासाचा वापर करत असतात.
एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाण्यासाठी विमानाचा वापर करतात.
मात्र, जगात एक अशी विमान आहे जे केवळ 90 सेकंदांसाठी धावते.
स्कॉटलंडमधील ऑर्कने दोन बेटांदरम्यान वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे यांच्या दरम्यान हे अनोखे विमान धावते. कारण हे समुद्रामध्ये आहेत.
2.7 किलोमीटरचे अंतर हे विमान फक्त 90 सेकंदात पार करते. या दोन्ही बेटांवर पोहोचण्याची विक्रमी वेळ 53 सेकंद आहे.
परंतु, विमान टेक ऑफ आणि थांबवण्यासाठी काही सेकंद लागतात आणि लँडिंगची वेळ 1 मिनिट आहे.