भारतातील 'या' राज्यात कोट्यवधी रुपये कमावून सुद्धा 1 रुपयाही Tax द्यावा लागत नाही

Pooja Pawar
Apr 07,2025


जर तुम्ही भारतीय नागरिक आहात तर तुम्हाला तुमच्या कमाईवर टॅक्स स्लॅबनुसार Income Tax भरावा लागतो.


पण भारतात एक असं राज्य आहे ज्याला Tax Free राज्य म्हणून ओळखले जाते.


सिक्कीममध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या कमाईवर एक रुपयाही इनकम टॅक्स द्यावा लागत नाही.


सिक्कीमच्या लोकांना आयकर अधिनियमचं कलम 10 (26AAA) नुसार इनकम टॅक्समध्ये सूट मिळाली आहे.


पण सिक्कीम राज्याच्या नागरिकांना इनकम टॅक्स स्लॅबमध्ये एवढी सूट का दिली जाते? याबाबत जाणून घेऊयात.


1975 मध्ये सिक्कीम शहराचं भारतात विलीनीकरण झालं होतं. पण यावेळी सिक्कीम एका अटीवर भारतात सामील झाला होता की तो आपले पूर्वीचे कायदे आणि स्पेशल स्टेटसला तसंच ठेवेल.


सिक्कीमची ही अट सरकारने नंतर मान्य केली आणि घटनेच्या कलम 371-एफ अंतर्गत याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story