गुंतवणुकीसाठी एकाहून एक सरस पर्याय मागील काही वर्षांमध्ये चर्चेत आले असून, नव्या पिढीकडूनही गुंतवणुकीच्या या पर्यायांची चाचपणी होत आहे.
गुंतवणुकीचे महत्त्वाचे पर्याय म्हणजे पीपीएफ आणि एसआयपी. यातील पीपीएफमधून सुरक्षित आणि विश्वासार्ह परताव्याची हमी मिळते. इथं लॉक ईन पिरियड 15 वर्षांचा असतो.
एसआयपीमध्ये गुंतवणूक करणं जोखमीची ठरु शकते. मात्र इथं परतावा तुलनेनं जास्त मिळतो. एसआयपीमध्ये फ्लेक्सिबल इन्वेस्टमेंटचा पर्याय उपलब्ध असतो.
राहिला मुद्दा व्याजाचा, तर पीपीएफवर 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळतं. तर एसआयपीमध्ये साधारण 12 टक्के व्याज मिळण्याची शक्यता असते.
15 वर्षांसाठी 1.5 लाख रुपये पीपीएफमध्ये गुंतवल्यास एकूण 39.45 लाख रुपये इतका परतावा मिळतो.
एसआयपीमध्ये 1.5 लाख रुपये साधारम 15 दिवसांसाठी गुंतवल्यास सरासरी 59.46 लाख रुपये इतका परतावा मिळतो.
पीपीएफवरील परतावा हा करमुक्त असतो. तर, म्युच्युअल फंड, एसायपीवर एलटीसीजी इतका कर लागतो.