रस्त्याच्याकडेला छोट्या छोट्या पिवळ्य लाईट्स तुम्ही पाहिल्या असतील.
ही लाईट्स इंडिकेटरप्रमाणे काम करते. रात्री वाहनचालकांना सहाय्य करते.
पण या लाईट्सला काय म्हणतात? तुम्हाला माहिती आहे का?
दररोज रस्त्यावर दिसणाऱ्या या लाईट्सबद्दल जाणून घेऊया.
रस्त्यावर चमकणाऱ्या लाईट्सला रोड स्टड असे म्हटले जाते.
ड्रायव्हरला खराब वातावरणात तसेच रात्रीच्यावेळी रस्ता स्पष्ट दिसावा म्हणून या लाईट्स लावल्या जातात.
रोड स्टडवरुन वाहनांच्या हेडलाइट रिफ्लेक्ट होऊन चमकतात.
यामुळे वाहनचालकाला रस्त्याची दिशा स्पष्ट दिसते. अपघाताची शक्यता कमी होते.
रस्त्यावरील रोड स्टड सौर उर्जेवर चालतात. रात्रीच्यावेळी आपोआप चमकतात.