दरवर्षी लाखो तरुण आयएएस, आयपीएस बनण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यातील काहीजणांचेच स्वप्न पूर्ण होते.
आयपीएस शालिनी अग्निहोत्रीची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. ज्यांनी आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आयपीएस व्हायचं ठरवलं.
हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या शालिनी हा बालपणापासूनच हुशार, होतकरु होत्या.
आईसोबत एका व्यक्तीने दुर्व्यवहार केला, त्यावेळी शालिनीने आयपीएस होण्याचा निर्णय घेतला.
दिवसरात्र मेहनत करुन शालिनी यांनी यूपीएससी सीएसई 2011 मध्ये ऑल इंडिया एअर 285 रॅंक मिळवला. आणि आयपीएस म्हणून निवडल्या गेल्या.
शालिनी यांचे वडील बस कंडक्टर आणि गृहिणी आहे. आयपीएस बनणं हे त्यांच्यासाठी दूरचं स्वप्न होतं.
पण मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर शालिनी यांनी हे करुन दाखवलं.
आज आयपीएस शालिनी या लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी बनल्या आहेत.