सायबर गुन्हांपासून वाचण्यासाठी सरकारपासून बँकेपर्यंत खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात.
पण लोकांना सूचना देणारी एक बँक मॅनेजर महिलाच सायबर गुन्हेगारांच्या विळख्यात अ़डकली
सायबर गुन्हेगारांनी या महिलेच्या अकाऊंटमधून तब्बल 21 लाख रुपये गायब केले. विशेष म्हणजे एक महिन्यापर्यंत हा फ्रॉड सुरु होता.
एका नामांकित बँकेत असिस्टंट बँक मॅनेजर पदावर काम करणारी महिला सुट्टीवर होती. या काळात तीने इन्व्हेस्टमेंटचा प्लान केला.
ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करुन चांगल्या कमाईचा विचार तीने सुरु केला. यादरम्यान फेसबूकच्या माध्यमातून तिची ओळख एका ग्रुपबरोबर झाली
ट्रेडिंगमध्ये चांगले पैसे कमवण्याचं आमिष या ग्रुपमधल्या सदस्यांनी दिलं. त्यानंतर वेगवेगळ्या ट्रान्सेक्शनने या महिलेच्या अकाऊंटमदून 21 लाक रुपये काढण्यात आले.
तब्बल एक महिला हा प्रकार सुरु होता. 1 डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 पर्यंत चाललेल्या स्कॅमची महिलेला जराही कल्पना आली नाही.