डोंगरावरुन अगदी उंचावरुन थेट खाली पडणारा नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह म्हणजेच धबधबा.
विशेषत: पावसाळ्यात डोंगरमाध्यावरुन कोसळणारा पांढऱ्याशुभ्र पाण्याच्या प्रवाह म्हणजेच धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
परंतु, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता माहितीये? चला याविषयी सविस्तर जाणून घ्या.
कुंचिकल धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
कुंचिकल धबधब्याची उंची ही 455 मी. इतकी आहे.
हा धबधबा कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात आहे.
कुंचिकल धबधबा हा पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि अरबी समुद्रात वाहणाऱ्या वाराही नदीवर वसलेला आहे.
हा धबधबा फक्त भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वाच उंच धबधबा आहे.
याव्यतिरिक्त 1994 पासून कुंचिकल धबधब्यातील पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी देखील केला जातो.