सोन्याची किंमत पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अशा स्थितीत जर तुम्ही सोनं विकत घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे.
सोन्याला संकटाचा साथीदार म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करता, तेव्हा त्याची शुद्धता तपासून घ्या.
नेहमी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा (BIS) हॉलमार्क असणारं सर्टिफाइड सोनंच खरेदी करा. सरकारने तर आता हे अनिवार्यच केलं आहे.
याशिवाय सोनं किंवा दागिने खरेदी करताना प्युरिटी कोड, टेस्टिंग सेंटर मार्क, ज्वेलर्स मार्क आणि मार्किंगची तारीख नक्की तपासा.
सोनं खरेदी करताना वेगवेगळ्या ठिकाणी त्याची किंमत तपासून घ्या. सोन्याचा भाव 24, 22 आणि 18 कॅरेटच्या हिशोबाने वेगवेगळा असतो.
सोनं खरेदी करताना रोख व्यवहार करणं चूक ठरु शकतं. युपीआय किंवा नेट बँकिंगने व्यवहार करणं उचित असतं. बिल घेतल्याशिवाय दुकानाबाहेर पडू नका.
फसवणूक टाळण्यासाठी सोनं नेहमी आपल्या ओळखीच्या ज्वेलर्सकडून खरेदी करा. जेणेकरुन टॅक्स आणि इतर नियमांचं पालन होत आहे याची तुम्हाला माहिती असेल.
सोनं खऱेदी करताना मेकिंग चार्ज किती लावला जात आहे याकडेही लक्ष द्या. प्रत्येक ज्वेलर्सकडे तो वेगळा असतो. तसंच मशीनच्या सहाय्याने तयार दागिन्यांचा मेकिंग चार्ज 3 ते 25 टक्के असतो.