घरात झुरळ, पाल दिसले की प्रत्येकाला किळसवाणं वाटतं. घऱातील भांड्यावरही त्यांचा वावर होत असल्याने त्याचा थेट संबंध आरोग्याशीही असतो.
पालीची विष्ठा आणि लाळेमध्ये सल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं. त्यामुळे पाल घऱात येऊ न देणे हे सर्वांसाठी चांगलं असतं.
लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर एकत्र करून पाण्यात मिसळा. नंतर त्याचा स्प्रे घराच्या कोपऱ्यांमध्ये मारा. यामुळे पाली पळून जातील.
अंड्याच्या कवचामधून येणाऱ्या वासामुळे पाली पळून जातात. त्यामुळे पाली दिसतात अशा ठिकाणी ते ठेवा.
कॉफी पावडरमध्ये तंबाखू टाकून छोटे छोटे गोळे तयार करा आणि पाली दिसतात त्या ठिकाणांवर ठेवा.
लसणाच्या उग्र वासामुळे पाली जवळ जात नाही. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या दरवाजे, खिडक्या आणि कोपऱ्यांमध्ये ठेवा.
डांबर गोळ्यांमुळे पाली पळून जातात.
मोरपीसामुळेही पाली घऱात येत नाहीत असं बोललं जातं. त्यामुळे त्याचाही वापर करुन पाहता येईल.